‘शटलक्वीन’ सायनाच ठरली स्टार

नवी दिल्लीर-‘शटलक्वीन’ सायना नेहवालने उगवती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचा सरळसेटमध्येे पराभव करीत इंडियन बॅडमिंटन लीगमधील लढतीत विजय मिळवीला. सायनाने महिला एकेरीची ही लढत २१-१९, २१-८ अशा फरकाने ही लढत खिशात टाकत आपले वर्चस्व राखले.

‘शटलक्वीन’ सायना नेहवाल व उगवती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यामधील लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगू लागली असतानाच प्रत्यक्षात मात्र दोन स्टार खेळाडूंमधील लढत एकतर्फीच झाली. सायनाने महिला एकेरीची ही लढत २१-१९, २१-८ अशा फरकाने खिशात टाकत आपले वर्चस्व राखले. याचसोबत हैदराबाद हॉटशॉटस् संघाने नवी दिल्ली येथे झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीगमधील लढतीत अवध वॉरियर्सवर ३-२ अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला.

गुरूसाईदत्त आणि. तनोंगसाक यांच्यामधील पुरुष एकेरीची लढत रंगतदार झाली. तनोंगसाकने ही लढत १५-२१, २१-१४, ११-९ अशा फरकाने जिंकत हैदराबादची हुकुमत राखली. मात्र लिम खिम वाह व गोह शेम यांना मार्किस किडो व मथीयास बोये यांच्याकडून हार सहन करावी लागली. शिवाय के. श्रीकांतने अजय जयरामला हरवत अवधसाठी मोलाची कामगिरी केली.

Leave a Comment