लंडन – अल कायदा या अतिरेकी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या मानवी बॉम्ब बनून लंडनच्या सर्वात गजबजलेल्या हिथ्रो विमानतळावर आल्या असण्याची शक्यता गुप्तचर खात्याकडून व्यक्त केली जाताच या विमानतळावर सर्व यंत्रणांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला. अल कायदा या संघटनेने मानवी बॉम्बच्या तंत्रामध्ये काही नवे संशोधन केले असून ते महिलांच्या उरोजाभोवती गुंडाळून त्यांना विमानातून पाठवून स्फोट घडविण्याची योजना आखली आहे अशी माहिती, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यावरून हा इशारा देण्यात आला.
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सावधानतेचा इशारा
महिलांच्या अंगाभोवती गुंडाळलेली ही स्फोटके विमानातील स्कॅनर्सना सुध्दा दिसू नयेत आणि कोणत्याही सुरक्षा तपासणीत त्यांचा छडा लागू नये असे बदल अल कायदाने केले आहेत. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना कळली होती. त्यामुळे विमानतळावरल्या सर्व तपासणी यंत्रणांना सावध करण्यात आले.
या विमानतळावरील स्फोटक तज्ञ ऍन्डी ओपन हायमर यांनी हा धोका ओळखला आणि सुरक्षा यंत्रणांना सावध केले. अशी स्फोटके घेऊन येणार्या महिला विमानतळावर प्रवेश करतील आणि लंडनहून बाहेर पडणार्या काही विमानांमध्ये बसून आत स्फोट करतील, तशी योजना अल कायदाने आखली आहे. असे त्यांना कळले होते. त्यामुळे विमानतळावर प्रवेश करणार्या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी करण्यात आली.