
मुंबई – शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटाने कालपर्यंत १५० कोटी रुपयांचा व्यवसाय करून हिंदी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम नोंदवला आहे. हिंदी चित्रपट सृष्टी एखादा चित्रपट रिलीज झाला की तो पहिल्या आठवड्यात किती धंदा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. एक था टायगर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा धंदा केला होता परंतु चेन्नई एक्स्प्रेसने पहिल्या तीनच दिवसात ही मर्यादा ओलांडली आणि आठवडा संपेपर्यंत १५० कोटी रुपये कमावले.