मुंबईत हाय अलर्ट जारी

मुंबई – आज होत असलेला स्वातंत्र्यदिन आणि आगामी काळात होवू घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी शहरात सर्वत्र सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. त्याहसाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्या्त आला आहे. सर्वत्र नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरूवारी होत असलेल्या‍ स्वातंत्र्यदिन आणि आगामी काळात होवू घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रभर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संशयास्पद व्यक्तींची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातल्या पोलिसांची नजर असणार आहे. काही भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनही सुरू करण्यात आले आहे. चौकाचौकात नाकाबंदी करण्यात येतेय. समुद्र किना-यावरही पोलिसांनी करडी नजर ठेवली होती त्याचसाठी विशेष पथकाची नियुक्तीह करण्यात आली होती.

गणेशोत्सव समन्वय समितीच्या पोलीस संपर्कात असून त्यांना सावध राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी शहरात सर्वत्र सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. त्यासाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वत्र नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.

Leave a Comment