इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू

मुंबई, – १९९३ च्या बाँबस्फोटांमधील प्रमूख आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार आणि इक्बाल मिर्ची याचा लंडनमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप या वृत्ताला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. यापूर्वी भारत सरकारने इब्राहीम मिर्चीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली होती.

गेल्याय काही वर्षापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार इब्राहीम मेमन उर्फ इब्राहीम मिर्ची हा दाऊदचा तस्करीचा व्यापार सांभाळत होता. सोने आणि अंमलीपदार्थांची तस्करी करण्यात त्याचा सहभाग होता. १९९३ च्या बाँबस्फोटांमध्येही इक्बालचा सक्रीय सहभाग असल्याचे उघडकीस आले होते.

भारत सरकारने इब्राहीम मिर्चीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली होती. गेल्या काही दिवसांपासून इक्बाल लंडनमध्ये वास्तव्यास होता. भारताने त्याच्या हस्तांतरणासाठी ब्रिटन सरकारकडे पाठपुरावादेखील केला होता. बुधवारी रात्री मिर्चीचा ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागला. यामुळे इब्राहीमचा काही वेळातच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अद्याप या वृत्ताला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संदिग़धता आहे.

Leave a Comment