नवी दिल्ली – मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी, परिमंडळ 1चे उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि राजवर्धन सिंह यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यामुळे नांगरे- पाटील आणि सिन्हा यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्यपदकाने गौरवण्यात येणार आहे. हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांचा सन्मान होणार आहे. राष्ट्रपती भवनाने आज (बुधवार) यासंदर्भातील घोषणा केली.
विश्वास नांगरे- पाटील यांना शौर्यपदक
ताज हॉटेलवर हल्ला झाल्यानंतर ते पहिल्यांदा घटनास्थळी पोहचले. बुलेटप्रुफ जॅकेट किंवा कुठलीही अद्यावत शस्त्रे नसताना त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते.
खरंतर त्याचवेळी त्यांचा गौरव होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्र सरकारला राज्याच्या पोलिसांनी, 26/11 हल्ल्यावेळी बाजवलेल्या शौर्याची आठवण पाच वर्षानंतर आली आणि त्यानंतर राष्ट्रपती शौर्यपदकासाठी शिफारस केली. याशिवाय महाराष्ट्रातील इतर 40 अधिकार्यांचाही त्यांच्या विशेष कामगिरीसाठी सन्मान करण्यात येणार आहे.