‘बिग बी’, ऋषी कपूर झळकणार एकत्र

सिनेइंडस्ट्रीतील एकेकाळची लोकप्रिय जोडगोळी असलेली अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी २२ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.१९९१ साली आलेल्या ‘अजूबा’ या शशी कपूर दिग्दर्शित चित्रपटात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी पडद्यावर शेवटची एकत्र दिसली होती. यांचे कितीतरी चित्रपट गाजले होते. पण, ‘अजूबा’नंतर ही जोडी एकत्र दिसली नव्हती. त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा योग सुधीर मिश्रांनी जुळवून आणला आहे.

आगामी काळात सुधीर मिश्रांच्या ‘मेहरून्निसा’मध्ये २५ वर्ष एकमेकांशी न बोलणारे मित्र जेव्हा इतक्या वर्षांनंतर समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्या भावभावना कशारितीने उफाळून येतात याचे चित्रण या सिनेमातून करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात मेहरून्निसाची भूमिका ही मिश्रांची आवडती अभिनेत्री चित्रांगदा करणार आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्रांगदाला या दोन दिग्गजांबरोबर काम करण्याची फारशी संधी मिळणार नाही,

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा तरूण मेहरून्निसाच्या रोलमध्येम झळकणार आहे. त्यामुळे अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या तरूणपणीच्या भूमिका जे साकारतील त्या नटांबरोबर तिची जास्तीत जास्त दृश्ये असणार आहेत. पण, खरी जुगलबंदी असणार आहे ती अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यात. सुधीर मिश्रांच्या या सिनेमाचे शुट सप्टेंबरपासून लखनौमध्ये सुरू होणार असल्याचे समजते.

Leave a Comment