प्रीटोरिया – ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ वर ५० धावांनी विजय मिळवला. भारताने सुरूवातीला फलंदाजी करत केलेल्या २४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ४६.३ षटकांत १९३ धावांत संपला. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ला फायनल सामन्यात पराभव सहन करावा लागला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने २४३ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर शिखर धवनसह (६५ चेंडूंत ६२ धावा) आणि मधल्या फळीतील दिनेश कार्तिकच्या (७५ चेंडूंत ७३ धावा) फटकेबाजीमुळे भारत ‘अ’ला अडीचशेच्या घरात पोहोचता आले. रोहित शर्मा (६) आणि स्वत: कर्णधार पुजारा (१) झटपट परतल्याने २ बाद ३४ अशी भारताची अवस्था झाली.
फटकेबाज सलामीवीर धवन पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला. त्याला चौथ्या क्रमांकावरील कार्तिकची चांगली साथ लाभली. या जोडीने तिस-या विकेटसाठी १८.२ षटकांत ५.८९च्या सरासरीने १०८ धावांची भागीदारी करताना भारत ‘अ’ला सावरले. धवनच्या झटपट अर्धशतकी खेळीत ९ तसेच कार्तिकच्या खेळीत १० चौकारांचा समावेश आहे. स्थिरावलेली धवन-कार्तिक जोडी परतल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा डाव गडगडला. परिणामी ४९.२ धावांत भारताचा डाव २४३ धावांत संपुष्टात आला.
डावखुरा फिरकीपटू शादाब नदीम यांनी ३ विकेट तर मध्यमगती मोहम्मद शामीच्या यांनी २ विकेट धेतले. प्रभावी गोलंदाजीसमोर स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ची तारांबळ उडाली. भारत ‘अ’च्या अचूक मा-यासमोर त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ऑस्ट्रेलिया ‘अ’तर्फे यष्टिरक्षक टिम पाइनेच्या ४७ धावा सर्वाधिक ठरल्या.