अहमदाबाद- ब्रिटनमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी काही दिवसांपूर्वीच गुजरातचे मुख्य मंत्री नरेंद्र मोदीं यांना लंडनभेटीचे निमंत्रण दिले. लंडनभेटीचे आमंत्रण नरेंद्र मोदी यांना मिळाले आहे. याबद्दल मोदांनी ट्विट करताना म्हटलं आहे, मला याचा आनंद होत असून या भेटीचे त्यांदनी स्वायगत केले आहे.
‘द फ्युचर ऑफ मॉडर्न इंडिया’वर (आधुनिक भारताचा भविष्यकाळ) यावर ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये संबोधित करण्यासाठी या, अशीही विनंती या पत्रात मोदींना करण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच मोदींना हे निमंत्रण मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी लेबर पार्टीच्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचा गेल्या अनेक वर्षांपासून संपर्क आहे. नरेंद्र मोदी हे दिग्गज राजकीय नेते आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, अशी माहिती ब्रेंट नॉर्थमधील लेबर पक्षाच्या खासदार गार्डिनर यांनी दिली.
ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीतील भारतीय मित्र संघटनेचे अध्यक्ष आणि संसद सदस्य बॅरी गार्डिनर यांनी नरेंद्र मोदी यांना ब्रिटन भेटीचे पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी मोदींना ‘लंडन भेटीवर या’ असे निमंत्रणही दिले आहे.
आगामी काळात मोदी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यांच्याशी संवाद साधणे, हे ब्रिटनच्या हिताचेच आहे, असे मला वाटते. २००९ मध्ये मी त्यांना भेटलो होतो, त्या भेटीचा आनंद मला आजही आठवतो. दरम्याधन, लंडनभेटीचे आमंत्रण नरेंद्र मोदी यांना मिळाले आहे. याबद्दल मोदांनी ट्विट करताना म्हटलं आहे, मला याचा आनंद होत असून या भेटीचे त्यांनी स्वागत केले आहे.