चीनमध्ये भूकंप : 45 हजार घरांचे नुकसान

बीजिंग – चीनला आज (बुधवार) 6.1 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामध्ये सुमारे 45 हजार घरांचे नुकसान झाले आहे. झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनसह तिबेटला आज भूकंपाचा मोठा धक्का बसला. भूकंपामध्ये 87 नागरिक जखमी झाले. तसेच 45 हजार घरांची पडझड झाली आहे. भूकंपामुळे पूल व रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून, ठिकठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

या स्फोटाची माहिती देताना अधिका-यांनी सांगितले की, भूकंपाचा धक्का तब्बल 3400 गावांना बसला आहे. अनेक गावांमधील घरे पडली आहेत. बचाव दलाचे जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.