काश्मीर समस्येसाठी विशेष राजदूत नाही – अमेरिकेची स्पष्टोक्ती

वॉशिंग्टन – भारत-पाक तणाव निवळण्याकरीता विशेष राजदूत नेमण्याची कल्पना अमेरिकेने फेटाळून लावली आहे. तसेच दोन्ही देशांमधील अमेरिकेचे राजदूत भारत-पाकमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानकडून सतत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात असल्याच्या घटना घडल्यानंतर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. आम्ही दोन्ही देशांना चर्चा करण्यास उद्युक्त करू शकतो आणि चर्चेद्वारे तणाव निवळण्यास निश्चिरतच मदत होईल. त्यामुळे यासाठी विशेष राजदूत नेमण्याची आम्हाला गरज वाटत नाही. दोन्ही देशांमधील आमचे राजदूत सध्या या देशांमधील तणाव कमी कसा होईल यासाठीच प्रयत्नशील आहेत, असे अमेरिकेच्या प्रवक्त्या मेरी हार्फ यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, सध्या तरी आमचे इतकेच प्रयत्न राहणार आहेत की, चर्चेद्वारे या देशांमधला तणाव निवळावा. त्याकरिताच आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणार्यास हिंसाचाराबद्दल आम्हालाही काळजी वाटते आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांबाबत दोन्ही देशांमधील राजदूतांनी संबंधित सरकारसमोर प्रश्न् उपस्थित केले आहेत आणि भारत-पाक द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अमेरिका आशावादी आहे, हा संदेशही राजदूतांनी पोहोचवला आहे.

काश्मीर प्रश्नांवरील अमेरिकेच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. काश्मीर प्रश्नाावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेतूनच हा प्रश्नश सुटेल, असे आम्हाला वाटते. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही यामध्ये नक्कीच हस्तक्षेप करू, असेही मेरी हार्फ यांनी सांगितले.