3300 फूट उंचावरून महिलांचा स्टंट

bungi
कॅलिफोर्निया- डरके आगे जित है… या वाक्याची प्रचिती कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कमध्ये आलीय… कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कच्या पहाडावर जमिनीपासून तब्बल 3300 फूट उंच पहाडावरून दोरीवर चालण्याचा विक्रम दोन महिलांनी केलाय.

एमिली आणि हेले असं या धाडसी अमेरिकन महिलांचं नाव आहे. दोन पहाडाला दोरी बांधून त्यावरून या स्काईलाईनर्सनं चालण्याचा स्टंट केलाय. दोरीवरून चालताना एक स्काईलाईनर्स पडली तेव्हा लोकांचा श्वास काही काळ थांबला होता. मात्र डरके आगे जीत है..असं म्हणत ती दोरीच्या सहाय्यानं एका पहाडावरून दुस-या पहाडावर गेली.

Leave a Comment