सलमान करणार रितेशच्या सिनेमात काम

काही दिवसांपूर्वीच ‘बालक पालक’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुखने मराठी सिनेमाच्यात निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्या नंतर आता आगामी काळात येत असलेल्यास सिनेमाचे नामकरण त्याने ‘लई भारी’ असे केले आहे. ‘लई भारी’ या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये भूमिका करणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक निशिकांत कामत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

सलमान काम करीत असलेला ‘लई भारी’ हा सिनेमा या वर्षी डिसेंबर महिन्यात झळकणार असल्याचे समजते. ‘लई भारी’ या सिनेमाचे हैदराबादमध्ये सलमानसह तीन दिवसांचे शुटिंगही पूर्ण झाले आहे. या वृत्ताला निशिकांत कामतने दुजोरा दिला असून सलमानचा या सिनेमात पाहुण्या कलाकार म्हणून रोल आहे. या सिनेमात सलमान एक अस्सल मराठी माणसाच्या रुपातच झळकणार आहे.

संजय जाधवच्या ‘दुनियादारी’च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सिनेमाना पुन्हा बरे दिवस आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील नायकमंडळी मराठीकडे वळताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात सोशल नेटवर्किंग साइट्सनीही मराठी सिने इंडस्ट्रीला मदतीचा हात दिला असून त्यांना प्रसिद्धी चांगली मिळत आहे. त्याचमुळे आता मराठी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

Leave a Comment