संमेलनध्यपदासाठी अरूण गोडबोले यांचा अर्ज दाखल

पुणे, – सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे आणि लेखक संजय सोनवणी यांच्यानंतर सातारायेथील लेखक अरुण गोडबोले यांनी आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेत मंगळवारी दाखल केला.

साहित्य संमेलन येत्या डिसेंबर महिनाअखेरीस सासवड येथे होणार आहे. संमेलनाची निवडणूक प्रकि‘या 8 ऑगष्टपासून सूरू झाली असून 17 आगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अरूण गोडबोले यांच्या अर्जावर सूचक म्हणून डॉ. राजेंद‘ माने यांची स्वाक्षरी आहे. तर प्राचार्य रमणलाल शहा, मसाप सातारा शाखेचे अध्यक्ष मधुसूदन पत्की, लीना खांबेकर, ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी आणि बी.पी. गुरव हे अनुमोदक आहेत.. फ. मुं. शिंदे व सोनवणी यांच्यानंतर गोडबोले यांचा अर्ज आल्याने संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.

गोडबोले म्हणाले, गेले 30 वर्षे मी विविध विषयांवर लेखन केले आहे. पुरेशी साहित्यसेवा केलेली आहे. प्रवासवर्णन, बँकिंग विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. मी जे काम करतो ते मोठ्या व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळेल. संमेलनध्यक्षपदासाठी राज्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यपदासाठी पात्र आहेत परंतु ते निवडणुकीच्या प्रकि‘येमुळे अर्ज भरत नाहीत. अध्यक्षपद हे सन्मानाने द्यावे परंतु अजून घटनेत बदल झालेले नाहीत. ज्येष्ठ साहित्यिकांना मान राखून त्यांना सन्मान मिळण्याची गरज आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. सध्या गोडबोले हे कर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मराठी – हिंदी भाषेत सहा चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केलेले आहे.

Leave a Comment