श्रीदेवी पन्नाशीत

चेन्नई – तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याश्या गावात 13 ऑगस्ट 1963 मध्ये श्रीदेवीचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षी एका तमिळ चित्रपटात बाल कलाकार म्हणून श्रीदेवीने आपल्या करियरची सुरुवात केली. 1976 पर्यंत अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केले. मुंरू मुदिची या तमिळ चित्रपटात श्रीदेवीने प्रथमच अभेनेत्री म्हणून काम केले.

1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या सोलहवां सावन या चित्रपटातून श्रीदेवीने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. मात्र चित्रपट अयशस्वी ठरल्याने ती पुन्हा दक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. यानंतर 1983 मध्ये श्रीदेवीने हिम्मतवाला या चित्रपटाच्या माध्यमातून पून्हा’ एकदा कम बॅक करत बॉलीवुड मध्ये आपल नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. हे कम बॅक सार्थकी ठरलं.
या चित्रपटाच्या माध्यमातुन आपला ठसा उमटवण्यात ती यशस्वी ठरली. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या नगीना या चित्रपटाने श्रीदेवीच्या करियरला महत्वपूर्ण वळण दिले. या चित्रपटातील मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा’ या गाण्यावरील नृत्याने तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 1987 मध्ये प्रदर्शित झालेला मिस्टर इंडिया हा तिचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. तर 1989 मधला तिचा चालबाज हा चित्रपट देखील तितकाच यशस्वी झाला.

1996 मध्ये निर्माता-निर्देशक बोनी कपूरशी लग्न केल्यानंतर श्रीदेवीने चित्रपटांमध्ये काम करण कमी केल. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला जुदाई हा चित्रपट तिच्या करियर मधला शेवटचा सुपरहिट चित्रपट ठरला. बॉलीवुड मध्ये जीतेन्द्र आणि अनिल कपूर सह तिची जोडी चांगली जमली. 3 दशकाहून अधिक असलेल्या सिने करियर मध्ये श्रीदेवीने 200 चित्रपटांत काम केले.

यात 63 हिंदी, 62 तेलुगू, 58 तमिळ आणि 21 मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. गौरी शिंदे निर्देशीत इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून तब्बल 15 वर्षानंतर तिने पुन्हा एकदा दमदार कम बॅक केल. नुकतच तिला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment