डीएनए नमुन्याद्वारे मोनालिसाचे गूढ उकलणार

लंडन – लिओ नार्दो दा विंचीच्या जगप्रसिद्ध छायाचित्रातील मोनालिसाच्या वास्तविक जीवनाचा वेध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी फ्लोरेन्स येथील कबर खोदली असून डीएनए नमुन्याद्वारे मोनालिसाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

इटलीतील रेशीम व्यापारी फ्रान्सिस्को डेल गिओकोंडो यांच्या कुटुंबीयांची ही कबर असून त्यांची पत्नी लिसा गेरार्डीनी यांनी 16 व्या शतकात लिओ नार्दो दा विंचीच्या चित्रासाठी पोझ दिल्याचे सांगण्यात येते. इटलीतील सॅन्टीस्सिमी अन्नूझिंयाटा बासिलिकाच्या स्मशानभूमीत ही कबर आहे.

शास्त्रज्ञांनी या कबरीच्या दगडाला गोल छिद्र पाडले. त्यातून हाडांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. त्या नमुन्यांची गेल्या वर्षी एका चर्चजवळ सापडलेल्या तीन महिलांच्या अवशेषांशी तुलना केली जाणार आहे. कबरीमधील हाडे लिसाच्या रक्ताच्या नात्यातील म्हणजेच मुलाचे असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते.

आई आणि मुलाच्या डीएनएमध्ये साधर्म्य आढळले तर आम्हाला मोनालिसा सापडलीच समजा, असे सिल्व्हानो व्हिन्सेटी या शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

Leave a Comment