पाक कडून पून्हा गोळीबारी; 3 दिवसांत आठव्यांदा शस्त्रसंधीचा भंग

जम्मू – पाकिस्तानची घुसखोरी सुरूच असून मंगळवारी पाकिस्तानी सैन्याने पुन्हा भारत-पाक सीमेवर गोळीबार केला आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीर येथील सांबा जिल्ह्यात भारतीय चौकीवर जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानमधील अश्रफ चौकीवरून करण्यात आलेला हा गोळीबार सुमारे 15 मिनिटे सुरु असल्याचे समजते.

6 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी सैन्याने पूंछ येथे केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर सीमारेषेवर अत्यंत तप्त वातावरण असूनही पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानी सैन्याने सलग आठव्यांदा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला आहे. सतत चालू सलेल्या या संघर्षात दोन्ही बाजूंकडून गोळीबार होत असून अवजड शस्त्रास्त्रेही वापरली जात आहेत.