जम्मू: संचारबंदी कायम, कडेकोट सुरक्षेत अमरनाथ यात्रा सुरु

जम्मू – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यामध्ये जातीय दंगलीमुळे निर्माण झालेला तणाव अद्याप निवळला नसल्याने आजही येथील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान आज कडक सुरक्षेत पहाटे 4.30 वाजता अमरनाथ यात्रा सुरु झाली.

हिंसा पसरविल्या प्रकरणी 111 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 11 जण किश्तवर मधील असल्याची माहिती जम्मू-काश्मीर सरकार कडून देण्यात आली. किश्तवाडमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहेत.

त्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या हिंसाचाराची चौकशी करतील आणि आपला अहवाल राज्य सरकारला सादर करतील असे त्यांनी सांगितले. किश्तवाड येथे ईदच्या दिवशी उसळलेल्या हिंसाचारात तीनजण ठार झाले असून 20 नागरिक जखमी झाले आहेत. यावेळी 68 दुकाने, सात हॉटेल आणि 35 वाहने जाळण्यात आली होती.