जगातील सर्वात जुना पेंग्विन झाला छत्तीशीचा

इंग्लंड- जगातील सर्वात जुन्या किंग पेंग्विन मेस्सी’ याने नुकतेच 36 व्या वर्षात पदार्पण केले. अंटार्क्टिका प्रदेशात आढळणारा पेंग्विन पक्षी सर्वाच्याच परिचयाचा आहे. पांढ-या व काळ्या रंगाचा लुटूलुटू चालणारा पक्षी सर्वाचे लक्ष वेधून घेतो. सर्वसाधारणपणे हा पक्षी कायम बर्फाळ प्रदेशात आढळतो. जगातील सर्वात जुन्या किंग पेंग्विन मेस्सी’ याने नुकतेच 36 व्या वर्षात पदार्पण केले.

त्याच्या वाढदिवसाबद्दल इंग्लंडच्या प्राणिसंग्रहालयात मोठा समारंभ साजरा झाला. 1982 रोजी इंग्लंडच्या ग्लुकेस्टरशायर येथील बर्डलॅँड वन्यजीव पार्कमध्ये हा पेंग्विन आणला. त्या वेळी तो केवळ पाच वर्षाचा होता. हा पेंग्विन अजूनही त्यांच्या सर्व जमातीत जगात मोठा आहे. डेन्मार्कच्या प्राणिसंग्रहालयात गेंटू पेंग्विन’ त्याच्यापेक्षा दोन वर्षानी लहान आहे.

मात्र तेथील कर्मचा-यांनी गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव दाखल करण्याचा चंग बांधला, असे वृत्त डेली एक्स्प्रेस’ या दैनिकाने दिले. सर्वसाधारणपणे पेंग्विन पक्षाचे आयुर्मान हे जास्तीत जास्त 26 वर्षे असते. अन्य सर्व पक्षी-प्राणी सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्षे असते. मात्र किंग पेंग्विन मेस्सी’ हा 36 वर्षाचा आहे.