आंध्रच्या अजून दोन मंत्र्यांचे राजीनामे

हैदराबाद – स्वतंत्र तेलंगनाला विरोध करत आंध्रप्रदेशचे आरोग्य मंत्री कोंदरु मुरली मोहन आणि वनमंत्री एस. विजयराम राजू यांनी आज (सोमवार) आपल्या पदांचा राजीनामा दिला. मोहन आणि राजू यांच्या राजीनाम्यानंतर आंध्रप्रदेश विभाजनला विरोध करत राजीनामा देणार्‍या मंत्र्यांची संख्या 11 वर पोहचली आहे.

मोहन आणि राजू यांनी मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी यांच्या कार्यालयात आद आपला राजीनामा सादर केला. ज्या राजकीय पक्षांनी आंध्रप्रदेश विभाजनाला समर्थन केले आहे त्यांनी आपले समर्थन वापस घ्यावे, तर राज्य अविभाजीत राखण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच राहतील’ असेही या दोन्ही मंत्र्यांकडून सागंण्यात आले.