अँशेस मालिकेत इंग्लंडची हॅट्ट्रिक

स्टर ली स्ट्रीट – अँशेस मालिकेवरील वर्चस्व इंग्लंडने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्याअ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अँशेस मालिकेत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशीच कांगारूचा ७४ धावांनी पराभव केला. यापूर्वी इंग्लंडने २००९ आणि २०१० मध्येही अँशेस मालिका जिंकली होती. या विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-० ने आघाडी घेतली. या मालिकेतला अजून एक सामना शिल्लक आहे.

या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाला २२४ धावांवर रोखले. त्याने ५० धावा देत शानदार सहा विकेट घेतल्या. टीम ब्रेसनन व स्वानने प्रत्येकी दोन गडी बाद केले. विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-० ने आघाडी घेतली. इंग्लंड संघाने दुसर्यान डावात ३३० धावांची खेळी केली. अशा प्रकारे पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेणा-या ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९९ धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात कांगारूंना २२४ धावांपर्यंत मजल मारता आली.

तत्पूर्वी इंग्लंडने ५ बाद २३४ धावांवरून चौथ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. हॅरिसने इयान बेल (११३) व मॅट प्रायरला बाद केले. ब्रॉड १३ व ब्रेसनन ४५ धावांवर बाद झाले संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : पहिला डाव-२३८, दुसरा डाव : ३३०, ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : २७०, दुसरा डाव : सर्वबाद २२४.