ब्रिटनच्या नागरिकांना नाही क्रेडिट कार्डची गरज!

लंडन- खरेदी करताना के्रडीट तसेच डेबीट कार्डाचा वापर करून अनेकजण खरेदी करतात. मात्र तेही कार्ड विसरणे, हरविणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यातून सुटका करण्यासाठी म्हणून ब्रिटनचे नागरिक लवकरच आपल्या चेहर्‍याचा वापर करुन खरेदी करु शकतील अर्थात खरेदीसाठी त्यांना पैसे किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज लागणार नाही.

पेपाल एक असे तंत्र विकसीत करणार आहे, की ज्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी कोणतेही माध्यम लागणार नाही तर त्यांच्या चेहरा त्यांच्या अकांऊटशी जोडलेला असेल आणि दुकानदार त्याचाच वापर करून ग्राहकांच्या अकांऊंटमधून खरेदीची रक्कम घेऊ शकतो. अँड्रॉईड टेक्नोलॉजी असलेल्या फोनमध्ये यासंबंधी अप तयार करण्यात आलं आहे.

पेमेंटसाठी मोबाईलवर पिन नंबर स्लाईड करताच दुकानदाराच्या मोबाईलवर ग्राहकाच्या चेहर्‍याचा फोटो दिसेल. ग्राहकाने खरेदीसाठी होकार दिल्यावर दुकानदार ग्राहकाच्या फोवर क्लिक करून पेमेंट मिळवू शकेल

Leave a Comment