अमरावती- गटबाजी केली, तर हाकलून लावू, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांना दिला. गटप्रमुख व्हा; मात्र गटातटाचे बनू नका. प्रमुख राजकीय पक्ष म्हणून शिवसेना समोर येत असल्याचे अनेक सर्वेक्षणांतून पुढे आले आहे. त्यामुळे विजयाच्या दृष्टीने गटप्रमुखांनी कामाला लागले पाहिजे, असेही ते म्हणाले.
निवडणुकीत गटबाजी केल्यास हकालपट्टी- उद्धव ठाकरे
विमविच्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात जिल्ह्यातील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा शनिवार (10 ऑगस्ट) पार पडला. यावेळी ते बोलत होते. सैनिक हे मरण्यासाठीच असतात,फ असे विचार असलेल्या शेळपट काँग्रेसवाल्यांच्या भरवशावर देश सोडू नका. नागरिकांचा शिवसेना कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सेनेच्या गटप्रमुखांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे आदित्य ठाकरे, पक्षनेता अनिल देसाई, खा. अनिल देसाई, खा. आनंदराव अडसूळ, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी खासदार अनंत गुढे, आ. अभिजित अडसूळ, जिल्हाप्रमुख संजय बंड, बाळासाहेब भागवत, महापालिका विरोधी पक्षनेता प्रा. प्रशांत वानखडे, महानगर प्रमुख दिगांबर
डहाके, अमोल निस्ताने उपस्थित होते.
