
कोची: प्रथमच पूर्णपणे देशात बांधण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या नव्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण सोहळा आज कोची येथे झाला. संरक्षणमंत्री ए.के. अँन्थनी यांच्या पत्नी एलिजाबेथ यांच्या हस्ते या नौकेचे जलावतरण झाले. महाकाय आकाराच्या व क्षमतेच्या विमानवाहू युद्धनौकेची स्वत: बांधणी करू शकणार्या निवडक देशांच्या पंक्तीत भारताने मानाचे स्थान पटकावले आहे.
भारताचे सागरी हित जपण्यासाठी अशा प्रकारच्या स्वदेशी बनावटीच्या नौकांची बांधणी आवश्यक आहे, असे भारताचे संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी यावेळी बोलताना सांगितले. भारताच्या जहाज बांधणी कार्यक्रमामध्ये देशातील उद्योगसमुहाने योगदान द्यावे, असे आवाहनही अँटनी यांनी यावेळी केले.
या विमानवाहू युद्धनौकेच्या बांधणीस कोचिन शिपयार्डमध्ये सुमारे साडेचार वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2006मध्ये संरक्षणमंत्री ए.के. अँन्थनी यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. या युद्धनौकेच्या बांधणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून जलावतरणा नंतर ही नौका पुन्हा जहाजबांधणी आवारात आणून तिची बाह्य बांधणी व अंतर्गत संरचना पूर्ण केली जाणार आहे.
बांधणी पूर्ण झाल्यावर वर्ष 2018च्या अखेरीस नौदलात सक्रिय ड्युटीसाठी दाखल होण्यापूर्वी 2016पासून विक्रांतच्या विविध प्रकारच्या व्यापक चाचण्या घेतल्या जातील. तोपर्यंत नौदलात सध्या कार्यरत असलेली आयएनएस विराटफ ही एकमेव विमानवाहू युद्धनौकाही सेवेत राहील, असे अँडमिरल धवन यांनी सांगितले. भारताने रशियाकडून अँडमिरल ग्रोशकॉव्हफ ही जुनी विमानवाहू युद्धनौकाही विकत घेतली असून, तिचे सध्या नूतनीकरण सुरू आहे.
वर्षभरात ती विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य या नावाने नौदलात दाखल होईल. त्यामुळे 2018नंतर नौदलाकडे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर विक्रांत व विक्रमादित्य अशा दोन विमानवाहू युद्धनौका उपलब्ध होतील. तसे झाल्यावर देशाच्या पूर्व व पश्चिम सागरी किनार्याच्या रक्षणासाठी प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका उपलब्ध होईल.
मिग 29 के, लाईट कॉम्बॅट एअरक्राप्ट, कॅमॉव्ह 31 या विमानांखेरीज बहुद्देशीय हेलिकॉप्टर्स या वरून उडाण भरू शकतात. परिचालनासाठी चार गॅस टर्बाईन्स. कमाल वेग ताशी 28 सागरी मैलांहून अधिक. बांधणीसाठी सेलफने तयार केलेल्या खास पोलादाचा वापर करण्यात आला आहे. ब्रिटनकडून घेतलेली जुनी विमानवाहू युद्धनौका नूतनीकरण करून आयएनएस विक्रांतफ याच नावाने भारतीय नौदलातील पहिली व एकमेव विमानवाहू युद्धनौका म्हणून दाखल झाली होती.
सुमारे 25 वर्षे सेवा बजावल्यावर जुनी विक्रांतफ निवृत्त झाल्यानंतर आता पहिल्या देशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेसही विक्रांतफ हेच नाव देण्यास राष्ट्रपती व तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च सेनानी प्रणव मुखर्जी यांनी अलीकडेच खास परवानगी दिली होती.