जम्मू- गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील किश्तवारमध्ये जातीय दंगल उसळलेली आहे. या जातीय हिंसाचाराचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. त्याकमुळे तेथील परिस्थिती चिघळवण्याचे काम भाजपकडून केला जात आहे, असा आरोप जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. आगामी काळात होणार असलेल्याआ लोकसभा निवडणूकीमुळे भाजपकडून राजकीय ध्रुवीकरण केले जात असल्याचे ओमर यांनी म्हाटले आहे.
दोन दिवसांपूर्वी किश्तवारमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रथमच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली. २००८ सालसारखी परिस्थिती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता सांगितले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी भडकावण्याचे काम न करता शांतता कायम राखण्यास भाजप नेत्यांनी मदत करावी असे, आपण लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांना दूरध्वनीवरून सांगितले असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले.
काश्मीर खो-यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर किश्तवारकडे जाणारे भाजप नेते अरूण जेटली, खासदार अविनाश राय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांना पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेऊन माघारी पाठवले. त्यावर ही लोकशाहीला पुरक घटना नाही, अशी टीका भाजपने केली. तसेच हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी निघालेल्या पिपल डेमोक्रेटिक पक्षाच्या महबुबा मुफ्ती यांनाही श्रीनगर येथील घरात स्थानबद्ध करण्यात आले.तणावग्रस्त जम्मूमधील रोजौरी जिल्ह्यात शनिवारी रात्री हिंसाचार व जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर लष्कराला पाचाराण करण्यात आले. उधमपूर, सांबा आणि कठुआ या तीन जिल्ह्यात रविवारी संचारबंदी लावण्यात आली. या भागात लष्कराने ध्वजसंचालनही केले. जम्मूमधील दहा जिल्ह्यांपैकी सात जिल्हे हिंसाचारमुळे प्रभावित झाले आहेत.