
केवळ उपदेशात्मक डोस न पाजता आपल्या मनातील समाजजागृतीचा विचार हसतखेळत प्रेक्षकांसमोर मांडण्याचं आजचं युग आहे. मिलिंद कवडे अशाच प्रकारचे सिनेमे बनवण्यावर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. त्यामुळेच येड्यांची जत्रा या सिनेमानंतर सिल्व्हर स्क्रीन एंटरटेनमेंटचे शरद कुमार श्रीवास्तव यांच्या साथीने मिलिंद कवडे गंमत हा सिनेमा घेऊन आले आहेत. नवराबायकोच्या नात्यांमधील आंबट-गोड प्रसंगांचा आलेख. कधी भावूक तर कधी गुदगुल्या करणारा हा सिनेमा ब्लॅक कॉमेडी या पठडीत मोडणारा आहे. संगीत नितिनकुमार गुप्ता यांचे असून सिनेमात संजय नार्वेकर आणि जितेंद्र जोशी, स्मिता गोंदकर, आदिती सारंगधर यांच्या भुमिका आहेत.