भाजपात सुब्रह्मण्यम स्वामी यांचा प्रवेश

नवी दिल्ली – जनहित याचिकेसारख्या मार्गांचा अवलंब करून यूपीए सरकारचे अनेक घोटाळे उघडकीला आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचा जनता पक्ष रविवारी भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी या विलिनीकरणाची घोषणा केली. मी सुब्रह्मण्यम स्वामींचे स्वागत करतो, असे सिंह यावेळी म्हणाले. या निर्णयाने मी आनंदी आहे. मी जनसंघात होतो. आता माझ्या पूर्वीच्या सहकार्‍यांसोबत काम करता येईल, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी व्यक्त केली आहे.