
आपल्या दहा वर्षांपेक्षा जास्तीच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता स्वत:ला बदलण्याचा विचार करत आहे. बर्याच वर्षांपासून आपण एकाच छापाच्या भूमिकांमध्ये गुरफटून गेल्यासारखे तिला वाटत आहे. यातून तिला बाहेर पडण्याची इच्छा असून लवकरच तिचे हे बदललेले रूप पाहण्यास मिळेल. खरेतर प्रियंकाने त्याची सुरुवात आधीच केली आहे. बर्फी असो वा सात खून माफ किंवा लवकरच पूर्ण होत असलेला भारताची ऑलिम्पिक विजेती मुष्टीयोद्धा मेरी कॉमच्या जीवनावरील चित्रपट या सगळय़ांमध्ये तिने वेगळय़ा प्रकारच्या भूमिका देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियंकाने अशा आगळय़ा पठडीतील चित्रपटांमध्ये काम करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे. मात्र दुसरीकडे ती गंभीर स्वरूपाच्या भूमिकांना वैतागली असल्याचेही जाणवत आहे. त्यामुळेच आता हलक्याफुलक्या भूमिका करण्यावर ती जोर देणार आहे.