पृथ्वी-2’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालासोर – जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या पृथ्वी-2’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची सोमवारी ओदिशा येथील चांदीपूर लष्करी तळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 किमी आहे. या क्षेपणास्त्राची सकाळी सव्वानऊ वाजता ही चाचणी भारतीय लष्करातर्फे करण्यात आली.

ही चाचणी लष्कराच्या नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याची माहिती सैन्य दलाच्या अधिका-यांनी दिली. यापूर्वी 20 डिसेंबर 2012 रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.