
’फिल्म फार्म’ निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ’नारबाची वाडी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलिज करण्यात आला. कोकणातली पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातल्या व्यक्तिरेखाही त्या मातीची वैशिष्ठ्य घेऊन आलेल्या आहेत.’उलाढाल’ आणि ’सतरंगी रे’ या गाजलेल्या बिगबजेट चित्रपटानंतरचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा प्रदर्शित होणारा ’नारबाची वाडी’ हा तिसरा चित्रपट आहे. ’शज्जानो बागान’ या मनोज मित्रा लिखित गाजलेल्या बंगाली नाटकावर ’नारबाची वाडी’ हा मराठी चित्रपट आधारलेला आहे. ’नारबाची वाडी’ चे पटकथा आणि संवाद लेखन तसेच गीत लेखनही गुरु ठाकूर यांनी केले आहे.