मॉस्को: जागतिक अथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जमैकाच्या उसेन बोल्टने जिंकले आहे. बोल्टने ही शर्यत ९.७७ सेकंदांमध्ये पूर्ण केली. हे सुवर्णपदक जिंकताना बोल्टने अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.

यापुर्वी जागतिक अथलिटिक्समुले स्पर्धेत जमैकाचाच नेस्टा कार्टर तिसरा आला आहे. विशेष म्हणजे या शर्यतीत अंतिम आठ जणांमध्ये चारजण जमैकाचेच होते. त्यात दोघांनी पदके मिळवली आहेत. त्यामुळे एका अर्थाने जागतिक अथलिटिक्स स्पर्धेवर जमैकाचाच वर्चस्व राहिले आहे.
याआधी बर्लिनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत बोल्टने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. तर २०११ मध्ये झालेल्या जागतिक अथलिटिक्सप स्पर्धेत बोल्ट या शर्यतीत अपयशी ठरला होता. यंदा मात्र त्याने सुवर्ण पदकाची १०० मीटर शर्यतीतील कसर भरून काढली आहे. बोल्टमने सुवर्ण पदक मिळवून विश्वविजेतेपद परत मिळवले आहे.