किश्तवाड दंगलीत वरिष्ठ नेत्याचा हात – जेटली

नवी दिल्ली – किश्तवाडच्या जातीय दंगली प्रकरणी आज (सोमवारी) राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी केंद्र आणि जम्मू आणि काश्मीर सरकारवर जोरदार तीका केली. किश्तवारमध्ये झालेल्या दंगलीमध्ये राज्य सरकारच्या वरिष्ठ नेत्याचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केला.

तसेच दंगलींच्या वेळी पोलीस हे मूक साक्षीदार बनून राहिले होते, असा आरोपही जेटली यांनी केला. राज्य सरकारने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपने केला. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती
यांनी केली. जातीय दंगल झाल्याप्रकरणी माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी चिंता व्यक्त केली.