चेन्नई एक्सप्रेस

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटल की हसून लोटपोट व्हायला लावेल अशी कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सीन्सचा भडीमार या गोस्टी सर्वप्रथम आठवतात. गोलमाल सिरिज, सिंघम यामुळे रोहित कडुन अशी अपेक्षा ठेवणे गैर नाही. शाहरूख खान आणि दिपीका पदुकोणला सहा वर्षानंतर ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये रोहितने एकत्र आणले आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघुन तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करणार असे दिसते. मात्र ‘चेन्नाई एक्सप्रेस’ने ट्रॅक सोडला आहे.

‘चेन्नई एक्सप्रेस’ ही कथा आहे चाळीशी उलटलेल्या, अविवाहीत राहुलची.(शाहरुख खान) राहुल आठ वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला. त्याला त्याच्या आजी-आजोबांनी सांभाळल आहे. त्यांना सांभाळण्यासाठीच त्याने लग्नाचा विषय मागे टाकलेला आहे. राहुलच्या आजोबांचा शंभराव्या वाढदिवशी मृत्यू होतो आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी राहुल त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी रामेश्‍वरमला जाण्याचे ठरवतो. प्रवासा दरम्यान चेन्नई एक्सप्रेसमध्ये राहुल आणि मीनाम्मा (दीपिका पादूकोन) यांची भेट होते. मीनाम्माला जबरदस्तीने तीचे चुलत भाऊ गावी नेत आहेत. हे राहुलच्या लक्षात येत नाही पण परिस्थिती असे प्रसंग उभे करते की त्यालाही तिच्यासोबत तिच्या गावी जावं लागते. गावात आहे मीनाम्माच्या वडिलांचा म्हणजेच दुर्गेश्वरा अजहागुसुंदरम (सथ्यराज) यांचा दबदबा आहे आणि त्यांचा विक पॉईंट आहे बिना आईची सांभाळलेली त्यांची मीनाम्मा. दुर्गेश्वराला शेजारच्या गावात राहणार्‍या तांगाबल्ली (निकेतन धीर) याच्यासोबत आपल्या मुलीचा विवाह होताना पाहायचाय मीनाम्माला मात्र हा विवाह करायचा नाही. राहुलला या गावातुन बाहेर पडायचे आहे आणि मीनाम्मालाही विवाहापासून सुटका हवी आहे. यातुनच त्यांचे लव्हस्टोरी आकार घेते.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आजवरच्या जवळपास सगळ्याच चित्रपटाचा नायक अजय देवगण होता. जो सहसा लाऊड आणि नाट्यमय सिनेमांमध्ये आपल्या मर्यादेत राहुन अभिनय करतो. मात्र शाहरुख त्याला अपवाद आहे. तो या चित्रपटात आणखीनच आरडाओरडा करण्याच्या नादात दिसतोय. तो वारंवार आपल्या मागील चित्रपटातील डायलॉग, उदाहरणार्थ… माय नेम इज राहुल, आय अ‍ॅम नॉट अ टेररिस्ट (माय नेम इज खान), किंवा रा. वन छम्मक छल्लो’, ओम शांति ओममधील दर्द-ए-डिस्को’, दिल से’ या चित्रपटातील जया जले’ हे गाणे गाताना दिसत असतो. सोबतच डॉन’ मधील काली बिल्लीचे स्मरण करत असतो. यात गंमतीशीर ते काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

या सिनेमातील विनोदाचा आधार हा आहे, की एक उत्तर भारतीय तरुण दक्षिण भारतीय गावांत पोहोचतो. त्याच्या आजुबाजूला लोक जमले असून ते वेगळ्याच भाषेत संभाषण करत असतात. मात्र हा पंजाबी मुंडा ती भाषा समजू शकत नाही. चित्रपट हिंदी असला तरी त्यातील अनेक संवाद तामिळ भाषेत आले आहेत. दोन्ही भाषांसाठी सबटायटल्सची गरज नाहीये. चित्रपटातील सर्व संवाद घासूनघासून गुळगुळीत झालेले आहेत. तर अ‍ॅक्शन सीन्समध्येही नाविन्य नाहीये. चित्रपटाची जमेची बाजु आहे छायाचित्रण, दक्षिण भारताचे अप्रतिम दर्शन रोहितने घडवले आहे. कश्मीर मैं तू कन्याकुमारी’ गाण्याचं चित्रिकरण पाहण्यासारखं झाल आहे. एखादा मराठी चित्रपट तयार करता येईल एव्हढा पैसा या एकाच गाण्यावर ओतला आहे गाणं एकदम पैसा वसूल… बाकिच्या इतर गाण्यांना थोडा टिपिकल साऊथ टच आहे. लुंगी डान्स तर तरूणाईत आपली छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे. मात्र एकंदरीत रोहितची चेन्नई एक्सप्रेस रूळावरून घसरलेली आहे.

 

Leave a Comment