दंगलीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू

जम्मू: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाजमध्ये कर्फ्यू असतानाही शनिवारी हिंसाचार झाला, ज्यामध्ये तीन नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन गटामध्ये झालेल्या दंगलीनंतर पुन्हाी रविवारी जम्मू, रजौरी, रियासी आणि उधमपूर भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यू लावण्यात आलेल्या शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याचदरम्यान राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली किश्तवाडचा दौरा करण्यासाठी जम्मूमध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांना त्यांरनी यावेळी सुरक्षेच्याल कारणामुळे रोखले. येथील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी अरुण जेटली यांना जम्मूहून पुढे जाण्यास मज्जाव केला. पण जेटली यांच्या अडवणुकीमुळे जम्मूतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेरच धरणे आंदोलन सुरु केले आहे. किश्तवाडमधील हिंसाचारात बळी पडलेल्यांचा आणि नुकसानीचा आकडा सरकार जाणूनबुजून लपवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

किश्तवाडच्या जातीय दंगलीचे परिणाम शनिवारी राजधानी दिल्लीतही दिसून आला. दिल्ली पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धुमश्चक्री पाहायला झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलनकांनी काँग्रेसविरोधात जोरदार नारेबाजी केली. दरम्यान, कर्फ्यू लावण्यात आलेल्या शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment