दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागणारी अरिहंत पाणबुडी तयार

नवी दिल्ली – देशाचे रक्षण हवा, जमीन आणि पाणी या तिन्ही मार्गाने करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून पाण्यातून साडेसातशे किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागू शकणारी आयएनएस अरिहंत ही पाणबुडी भारतीय नौदलात समावेशासाठी सज्ज होत आहे. या पाणबुडीचा न्यूक्लिअर रिअॅक्टर कांही तासांपूर्वीच सुरू करण्यात आला असून ही पाणबुडी सागरातील चाचण्यासाठी आता सज्ज झाली आहे.

सुमारे ६००० टन वजनाची ही पाणबुडी विशाखापट्टणम येथील जहाज कारखान्यात तयार केली गेली असून तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आजपासून म्हणजे शनिवारपासून तिच्या अंतिम चाचण्या समुद्रात घेतल्या जाणार असून या चाचण्या १८ महिने चालणार आहेत. ७५० किमी रेंजची १५ बेलेस्टीक मिसाईल डागण्याची तिची क्षमता आहे.

भारताकडे यापूर्वीच जमिनीवरून डागता येणारी मोबाईल अग्नी क्षेपणास्त्रे आहेत तर सुखोई ३० व मिराज २००० मुळे हवेतून क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता भारताने मिळविली आहे. आता अरिहंतमुळे पाण्यातून क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता भारताला प्राप्त होत आहे. अरिहंतच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ती नौदलात रूजू होणार आहे.

Leave a Comment