शिर्डीतील सिरीयल किलर जेरबंद

नगर: गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये दहशत निर्माण करणा-या सिरीयल किलरला अटक करण्यात आली. ३५ वर्षीय सीरियलकिलर सतीश अलकोल या शुक्रवारी अटक करण्यात आली.सतीश अलकोलला नाशिकच्या राहता कोर्टात हजर केल्यानंतर त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस उपअधिक्षक विवेक पाटील यांनी ही माहिती दिली.अलकोलने शिर्डीत पाच भिका-यांची हत्या केल्याचं समोर आले होते. गेल्याश काही दिवसांपासून नगर शहर वपरिसरात डोक्यावर अवजड वस्तूने हल्ला करुन त्यांचे खून केल्याचे समोर आले होते.

सीसीटीव्ही फुटेज, रेखाचित्र आणि अनेक भिका-याकडून मिळालेल्या माहितीनंतर सतीश अलकोला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सतीश अलकोलला नाशिकच्या राहता कोर्टात हजर केल्यानंतर त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.