बाईक क्रेझींसाठी आली चांदीची बाईक

मुंबई – महागड्या आणि अनोख्या बाईक क्रेझींसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांची हौस भागविण्यासाठी दुनियेतील सर्वात महाग, पूर्ण चांदीपासून बनविलेली बाईक सादर करण्यात आली असून तिची किंमत ५० लाख ते १ कोटी रूपयांच्या दरम्यान आहे. अशा प्रकारची पहिली बाईक मुंबईत भरलेल्या ज्युवेलरी प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. सिल्वर एंपोरियम तर्फे सादर करण्यात आलेली ही बाईक ग्राहकाच्या ऑर्डरप्रमाणे तयार करून दिली जाणार आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल मेहता या विषयी बोलताना म्हणाले की ही बाईक संपूर्णपणे हाताने तयार केली गेली असून तिचे सर्व पार्टस चांदीचे आहेत. फक्त इंजिन इनफिल्ड बुलेटचे वापरले गेले आहे. ही बाईक म्हणजे कारागिर आणि इंजिनिअर यांच्या कलेचा अद्भूत नमुना आहे. ती बनविण्यासाठी आठ महिने लागले आहेत.

जे ग्राहक अशा प्रकारच्या बाईकची ऑर्डर देतील, त्यांना प्रथम त्यांच्या पसंतीनुसार डिझाईन दाखविले जाईल आणि नंतर ती बाईक जयपूरच्या प्लँटमध्ये तयार केली जाईल. त्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागेल असे कंपनीचे अध्यक्ष कांतीलाल मेहता यांनी सांगितले.

Leave a Comment