पी.व्ही. सिंधूला कांस्य पदक

ग्वांगझाऊ: बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्या मुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. थायलंडची तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली आणि या स्पर्धेतल्या चौथ्या सिडेड रॅचॅनोक इन्टानोनने सिंधूचा पराभव केला.

भारताच्या पी.व्ही. सिंधूची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती, पण अंतिम फेरीत धडक देण्यात ती अपयशी ठरली. सामन्यात रॅचॅनोकने पहिला गेम २१-१० असा आरामात खिशात टाकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण रॅचोनाकने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसरा गेमही २१-१२ असा जिंकून घेतला.

याआधी एप्रिलमध्ये झालेल्या इंडिया ओपन सुपर सीरिजमध्ये रॅचोनाकने सिंधूवर २१-१२, २१-६ अशी मात केली होती. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.