नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन इब्राहिम दाऊदला वाचवण्यासाठीच पाकिस्तानचा खटाटोप सुरु आहे. त्यादमुळे दाऊदने पाकिस्तानमधून पलायन केल्याचे वृत्त भारताची दिशाभूल करण्यासाठी आहे. त्यामुळे सरकारने या वक्तव्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन भाजपने केले आहे. दाऊदला वाचवण्यासाठीच पाकचा प्रयत्न सुरु असल्याची टीका भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी केली आहे.
शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत, शहरयार खान यांनी दाऊद हा पाकमधून पळून गेल्याचे म्हटले होते. शिवाय दाऊद आधी पाकिस्तानात होतं, हेही त्यांनी मान्य केलं होतं. त्यानंतर पाकिस्तान भारताची दिशाभूल करत असून त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला विरोधक तसंच संरक्षणतज्ज्ञ भारत वर्मा यांनी सरकारला दिला आहे.
गेल्याव काही दिवसानंतर पाकने शुक्रवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. त्यांाच्यांकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर भारत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.