न्यूर्यार्क – टिव्ही, फ्रिज, कार, मायक्रोवेव्ह अशा वस्तूंची ऑनलाईन खरेदी विक्री जगाला नवीन राहिलेली नाही. मात्र गेल्या कांही महिन्यात ऑनलाईन खरेदी विक्री करणार्या वेबसाईटचा वापर अनेक देशांतून लहान बालकांची विक्री करण्यासाठीही केला जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. न्यूर्यार्कमध्ये दोन महिन्यांपूर्वी याच माध्यमातून आपल्या गर्लफ्रेंडच्या मुलीची विक्री करणार्या पॉल मॉरक्यू या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
गर्लफ्रेड मुलगी झाल्यापासून आपल्याकडे कमी लक्ष देते यामुळे वैतागलेल्या पॉलने मुलीच्या विक्रीसाठी ऑनलाईन वेबसाईटचा मार्ग स्वीकारला आणि विशेष म्हणजे त्याला मुलीची खरेदी करण्याची तयारी असलेले गिर्हागईकही मिळाले. मात्र वेळच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. पॉलने केवळ १०० डॉलरमध्ये मूल विकायची तयारी दर्शविली होती. या घटनेपासून पोलिस अधिक सावध झाले आहेत.
केवळ न्यूर्यार्कच नव्हे तर अन्य देशातील कांही शहरातूनही असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानातही एका टिव्ही शोमध्ये अपत्यहीन पालकांना बक्षीस म्हणून मुल देण्याचा प्रकार सुरू असून हा पाकिस्तानी टिव्हीवरील सर्वात यशस्वी कार्यक्रम असल्याचे समजते. टिव्ही शो करणार्यानाही यात कांही गैर वाटत नाही. त्यांनी मनोरंजन आणि धर्म यांचा मेळ घातलेल्या या कार्यक्रमातून अपत्यहिनांना अपत्याचे सुख देणे हा परोपकार असल्याचे मत मांडले आहे.