वर्धा- जिल्ह्यातील हिंगणघाट येथे वणा नदीच्या पात्रात बोट उलटल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत चार जण ठार झाले. बोटीतून प्रवास करणारे सर्व जण शेतमजूर होते. तसेच बोटीत महिलांची संख्या अधिक होती. बोटीत 35 प्रवासी होते. काही शेतमजूरांनी पोहत किनारा गाठला. नदीतीन चौघांचे मृतदेह सापडले असून बेपत्ता वीस मजुरांचा शोध सुरु आहे.