पी.व्ही. सिंधूचा बॅडमिंटन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

नवी दिल्ली – सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यपच्या पाठोपाठ बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनंही आज (गुरुवार) जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. या स्पर्धेतील दुसरी मानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग यीहानवर मात करुन सिंधूने ही उलटफेर केली.

चीनमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत सिंधूनं वँग यीहानवर 21-18, 23-21 अशी मात केली आहे. तर या स्पर्धेत दहावे मानांकन लाभलेल्या सिंधूला पुढच्या फेरीत सातव्या मानांकित चीनच्या शिक्सीयन वँगशी सामना करावा लागेल.

Leave a Comment