धर्मांतरित ख्रिश्चनांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा – जयललिता

चेन्नई – देशातील हिंदू अनुसूचित जाती आणि धर्मांतरीत ख्रिश्चन यांच्यातील असंतूलित विकासामुळे सामाजिक तणाव वेळेनुसार वाढत गेला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने हिंदू, शिख आणि बौध्दांप्रमाणेच धर्मांतरित ख्रिश्चनांकडे पहावे तसेच त्यांचा अनुसूचित जातींच्या यादीत समावेश करावा अशी मागणी आज (शुक्रवार) तामिळनाडूची मुख्यमंत्री जयललिता यांनी केली.

पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात या दोन्ही जातीतील भिन्नतेमुळे अल्पसंख्यांक समुदायांमध्ये वेगळेपणाची भावना खोलवर रुजत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता दुर्लक्ष करुन चालणार नाही असेही जयललिता यांनी म्हटले आहे. जयललिता यांनी या दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातींमध्ये सामील करुन घेण्याची विनंती केली असून यासाठी त्यांनी रंगनाथ मिश्रा आयोगाच्या म्हणण्यानुसार संविधान (अनुसूचित जाती) आदेश, 1950 च्या तीसर्‍या उतार्‍याला काढून टाकण्यात यावे असे सांगितले आहे.

त्याचबरोबर अनुसूचित जात कोणत्याही धर्माची असो, त्यांना संविधान (अनुसूचित जाती) आदेश, 1950 मध्ये समाविष्ट केलेल्या अनुसूचित जातींच्या दर्जाच्या परिघात आणण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्यासाठी तत्काळ प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. संसदेच सुरु असलेल्या सत्रामध्ये याबाबत आवश्यक विधेयक आणावे अशीही विनंती जयललिता यांनी या पत्राव्दारे पंतप्रधानांना केली आहे.

Leave a Comment