झिम्बाब्वेने घेतल्या टीम इंडियाकडून टिप्स

बुलावायो – वन डे मालिकेत टीम इंडियाने झिम्बाब्वेचा सुफडा साफ केला. त्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांनी, स्मार्ट टिप्स घेण्यासाठी चक्क भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जायचा सल्ला दिला. त्या खेळाडूनीपण टीम इंडियाच्या क्रिकेटपटूकडून टिप्स घेतल्या.

बुलावायोतील पत्रकार परिषदेमध्ये झिम्बाब्वेचे प्रशिक्षक अँडी वॉलर यांनी याची माहिती दिली.
झिम्बाब्वीयन खेळांडूंमध्ये गुणवत्ता आहे, मात्र त्यांना अजून आगामी काळात बरेच काही शिकायचे आहे. त्यासाठी अजून त्यांना खूप काही मेहनत घ्यावी लागणार आहे. झिम्बाब्वेच्या संघाची प्रगती लगेच एक दोन महिन्यात शक्य नाही, तर ही काही काळ चालणारी प्रक्रिया असल्याचे वॉलर यांनी स्पष्ट केले.

आता टीम इंडियाच्या खेळाडूंकडून टिप्स घेतल्यावर श्रीलंकेबरोबर आगामी मालिकेत झिम्बाब्वियन खेळाडू अधिक आत्मविश्वसाने खेळतील असा विश्वास झिम्बाब्वेचे प्रशिक्षक अँडी वॉलर यांनी व्यक्त केला.

Leave a Comment