कांद्यांचा भाव गगनाला भिडला

नाशिक : कांद्याची देशांतर्गत मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्यांचा भाव पुन्हा एकदा चांगलाच वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातून होणारी आवकही कमी झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

दरम्यान शुक्रवारी सटाणा तालुक्यात कांदा ३६०० रूपये प्रति क्विंटल, तर नाशिकमध्ये ३ हजार ७०० रूपये प्रती क्विंटल तर वनीमध्ये कांद्याचा भाव ३ हजार ५८० रूपये प्रती क्विंटल आहे. गेल्या काहीदिसांपासपासून दरात लक्षणीय वाढ झाली आहे; कांद्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकमध्येच कांद्याचे दर वाढल्याने त्याचा परिणाम आता आगामी काळात देशभरात दिसून येईल.

काही दिवसांपूर्वी कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र पुन्हा दर पाचशे-सहाशेने खाली गेले होते. मात्र तीन-चार दिवसांतच पुन्हा कांद्याच्या भावाने भरारी घेतली आहे. त्यामुळे कादयांच्या दरवाढीने सर्वसामान्याला मेताकुटीस आणले आहे.