ओबामा-मिशेलनी घेतला भारतीय जेवणाचा आस्वाद

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 52 वाढदिवसाचं सेलिब्रेशन गुरुवारी थोडसं हटके पद्धतीने झाले. बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेलने रात्रीचे जेवण अमेरिकेतील एका पंचतारांकित भारतीय हॉटेलमध्ये घेणंच जास्त पसंत केलं.

व्हाईट हाऊसच्या जवळ असलेल्या रसिका रेस्टॉरंन्टफमध्ये त्यांनी एकत्र जेवण घेतलं. जेवणाला जाताना मिशेलने काळ्या रंगाचा वेष परिधान केला होता तर ओबामा नेहमीप्रमाणे सूटात होते.

रसिका रेस्टॉरंटने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या माहितीनुसार, ओबामा-मिशेल यांनी भारतीय तंदूरीफचा आस्वाद घेतला. दिल्लीस्थित अशोक बजाज यांच्या किंगब्राईट ग्रुपफचे हे रेस्टॉरंट असून वॉशिंग्टनमध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय आहे. बजाज हे गेल्या 25 वर्षांपासून हॉटेल क्षेत्रात काम करत आहेत.