ओडिशात 500 मगरी अंड्यातून बाहेर

केंद्रपाडा- ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय पार्कमधील मगर संशोधन फार्ममध्ये सुमारे 500 मगरी अंड्याचे कवच फोडून बाहेर आल्यामुळे वन्य प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जंगलातील काही कर्मचार्‍यांना मगरींच्या जन्माचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली.

मानवी हस्तक्षेपामुळे या मगरी हिंसक होऊ नयेत, यासाठी वन कर्मचार्‍यांनी सुरक्षित अंतर राखले होते. अंड्याचे कवच भेदून बाहेर आलेल्या मगरी लगेच पाण्यामध्ये गेल्या. संग्रहालयात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मगरींचा जन्म सुरक्षितपणे झाला आहे.