हैदराबाद देशाची दुसरी राजधानी करा

हैदराबाद – आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय झाल्यानंतर हैदराबादच्या भवितव्याबाबत अनिश्चितता कायम असतानाच आंध्र प्रदेशातील काही बिगर तेलंगणावादी नेत्यांनी हैदराबाद ही देशाची दुसरी राजधानी करावी, अशी मागणी केली आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप वर्षापूर्वी हैदराबाद देशाची दुसरी राजधानी बनविणची सूचना केली होती. तेलुगू देशम पक्षाचे प्रवक्ते सुधीश रामभोटला यांनी सांगितले की, सधच्या परिस्थितीत या मागणीवर सकारात्मक विचार झाला पाहिजे. तीन वर्षापूर्वी तेलुगू देशमने सर्वप्रथम ही मागणी केली होती. तेलुगू देशमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले होते की, डॉ. आंबेडकर यांनी ही सूचना केलेली होती.

तेलुगू देशमचे खासदार उंडावल्ली अरुणकुमार यांनीही अशीच मागणी केली आहे. आंध्र-रायलसीमा भागातील काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन मंगळवारी हैदराबादबाबत तीन प्रस्ताव सादर केले आहेत. दोन्ही राज्यांसाठी हैदराबाद ही कायमची राजधानी, केंद्रशासित अथवा देशाची दुसरी राजधानी असे तीन पर्याय सुचविण्यात आले आहेत.

राज्याचे विभाजन सुरळीत होण्यासाठी हैदराबादबाबत तीनपैकी कोणताही पर्याय स्वीकारण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी श्रेष्ठींकडे केली आहे.

Leave a Comment