मोबाईल हरवलाय, नो टेन्शन!

मुंबई- आपला मोबाईल हरवलाय. आता चिंता करू नका. तुम्ही तो इंटरनेटच्या माध्यमातून सहज शोधू शकता आणि हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल मिळवू
शकता. हरविलेला मोबाईल शोधण्यासाठी तुम्हाला वेबसाईट मदत करू शकणार आहेत.

मोबाईल हरवला की, पोलिसांना कळवा, तक्रार अर्ज करा आदी गोष्टी कराव्या लागतात. हे करूनही मोबाईल मिळेल, याची काय खात्री? पण यातून तुमची सुटका होणार आहे. तुम्हाला मोबाईल चोरी आणि हरविण्यापासून वाचविण्यासाठी काही वेबसाईटवर तुमचा आयएमईआय नंबर रजिस्ट्रेशन करावा लागेल.

मोबाईलचा शोध घेण्यासाठी काही संकेतस्थळावर मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ती आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. मोबाईल हरवला किंवा चोरी झाला की हे सॉफ्टवेअर तुम्हाला नेमके ठिकाण (लोकेशन) दाखवील. ते तुमच्या मोबाईल आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाईल इक्वीपमेंट आयटेंडीफाय) नंबरवर आधारित असेल. याशिवाय संकेतस्थळ आपल्या अन्य माहितीही देईल. त्यामुळे तुम्ही चोरीपासून आपला मोबाईल वाचवू शकाल.

तसेच काही टोल फ्री नंबरही या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याआधारे तुम्ही मदत घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही जेव्हा नविन मोबाईल खरेदी कराल त्यावेळी मोबाईलचा आयएमईआय नंबर माहिती करून घ्या. माहित नसेल तर *ञ्च्06ञ्च् (स्टार हॅश 06 हॅश) असे डायल करा आणि माहित करून घ्या. तसेच खालील वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा आणि आपला हरविलेला मोबाईल शोधा.

Leave a Comment