एसटीमहामंडळाची अष्टविनायक दर्शन सेवा

पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) -श्रावण मासाच्या निमित्ताने येत्या 8 ऑगस्ट (गुरुवार) पासून एसटीच्या शिवाजीनगर आगाराच्या वतीने भाविकांसाठी शिवाजीनगर बसस्थानकावरून ’अष्टविनायक दर्शन’ सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ आगार व्यवस्थापक विलास पाटील यांनी दिली.

ही यात्रा दोन दिवसांची असणार आहे. शिवाजीनगर येथून यात्रेला प्रारंभ होणार असून, थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव या ठिकाणी जाऊन ओझर येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. दुसर्‍या दिवशी ओझर येथील गणपतीचे दर्शन घेऊन लेण्याद्री, महड, पाली या ठिकाणी जाऊन दुसर्‍या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत बस शिवाजीनगर येथील आगारामध्ये येईल.

Leave a Comment